वृद्धाश्रमाची गरजच भासणार नाही ही संस्कृती निर्माण झाली पाहिजे - पत्रकार प्रकाश कुलथे - Mohsin e Millat Old

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

Saturday, 30 October 2021

वृद्धाश्रमाची गरजच भासणार नाही ही संस्कृती निर्माण झाली पाहिजे - पत्रकार प्रकाश कुलथे

 


 प्रसिद्ध उद्दोगपती विवेकानंद शर्मा यांच्या हस्ते 

वृद्धाश्रमाच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न


श्रीरामपूर =भारतीय संस्कृती ही कुटुंबप्रेमाची आणि वयोवृद्धांचा आदरभाव,सन्मानपूर्वक सांभाळ करणारी संस्कृती आहे, अशी संस्कृती जपली, वाढवली तर वृद्धाश्रमाची गरजच निर्माण होणार नाही, असे विचार महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे यांनी व्यक्त केले. 

   येथील गुरुमाऊली सेवाभावी संस्था संचलित माउली वृद्धाश्रमाच्या चतुर्थ वर्धापनदिन आणि नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार प्रकाश कुलथे बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्दोगपती श्री विवेकानंद गोरखनाथ शर्मा यांच्या हस्ते वृद्धाश्रमाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आणि कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. श्रीमती कमलाबाई शांतीलाल लुक्कड, सौ. शुभाताई छगनलाल लुक्कड, प्रमुख पाहुणे पत्रकार प्रकाश कुलथे,राजेंद्र बोरसे,बद्रीनाथ वढणे,  साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये,संयोजक सुभाष वाघुंडे, सौ. कल्पनाताई वाघुंडे,प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, सुखदेव सुकळे,नगर आकाशवाणीचे उद्घोषक संतोष मते,अड,गणेश सिनारे,दिनकरराव पोखरकर, शम्भूक वसतिगृहाचे प्रमुख अशोकराव दिवे, प्रसन्न धुमाळ, आरोग्यमित्र सुभाषराव सोनवणे,राजेंद्र रासने,अरुण विसपुते,सौ. वंदना विसपुते, शिरीष वाघुंडे सर्व वाघुंडे परिवार,  प्रभावती बबनराव शेरकर  सूर्यकांत कर्नावट,प्रसन्न धुमाळ आदिंच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्व्लन, प्रतिमापूजन करण्यात आले.मितेश ताके, कमलाबाई लुक्कड, शुभाताई लुक्कड, संतोष मते आदिंनी मनोगते व्यक्त केली.पत्रकार प्रकाश कुलथे यांनी एक दिवसाचा भोजन खर्च देणगी घोषित करून सांगितले की, सुभाष वाघुंडे आणि सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी येथे सेवेचे देवालय उभारले आहे,अशा ठिकाणी मदतीला हात देणे गरजेचे आहे असे सांगून ह्या वृद्धाश्रमास सहकार्य करावे असे आवाहन केले.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी समारोपाच्या भाषणात सांगितले की, संत गाडगेबाबा देवळात गेले नाहीत, त्यांनी जित्याजागत्या,अनाथ,  निराधार, दुबळ्या आणि बेघर झालेल्या लोकांची सेवा केली, सुभाष वाघुंडे आणि सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी आपले सर्वकाही देऊन ही मानवतेचे मंदिर उभे करीत आहेत,ह्या मानवसेवेच्या दानपेट्या भरल्या तरच त्या दानधर्माला अर्थ प्राप्त होतो असे सांगून ह्या वृद्धाश्रमाच्या चतुर्थ वर्धापनदिनाच्या वाटचालीचा आढावा घेतला, सुभाष वाघुंडे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले तर सौ.कल्पनाताई वाघुंडे यांनी आभार मानले.

LightBlog

Pages