अशोक कारखाना:ऊस तोडणी शुभारंभ - Mohsin e Millat Old

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

Tuesday, 12 November 2024

अशोक कारखाना:ऊस तोडणी शुभारंभ


 श्रीरामपूर / प्रतिनिधी:

तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सह.साखर कारखाना सन २०२४-२५ च्या ऊस गळीत हंगामासाठी अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार तथा कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली अशोक सहकारी साखर कारखान्याची सर्व मशिनरी सज्ज आहे. कारखान्याने सुमारे ६ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यासाठी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा भरलेली आहे. कारखान्याचे सर्व सभासद व बिगर सभासद यांनी नोंदीचा व बिगर नोंदीचा संपूर्ण ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे व्हा.चेअरमन हिम्मतराव धुमाळ यांनी केले आहे.

               श्रीरामपूर तालुक्याची कामधेनू असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ या ६८ व्या ऊस गळीत हंगामाचा पढेगांव गटातील ऐनतपूर येथील शेतकरी सौ.वसुंधरा सुरेश नाईक व श्री.सुरेश निवृत्ती नाईक यांचे शेतात ऊस तोडणी शुभारंभ व्हा. चेअरमन श्री.धुमाळ यांचे हस्ते मंगळवारी (ता.१२) करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

              सदर कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे संचालक यशवंत बनकर, अच्युतराव बडाख, शिवाजीराव वाबळे, भास्करराव बंगाळ, सचिन शेटे, प्रकाशराव नाईक, मच्छिंद्र भोसले, अण्णासाहेब गारडे, दादासाहेब भोसले, राजेंद्र महाले, अशोक कन्हेरकर, बाळासाहेब तागड, अनिल नाईक, हरिभाऊ काळे, शेतकी अधिकारी नारायण चौधरी, ऊस विकास अधिकारी विजयकुमार धुमाळ, गट प्रमुख संकेत लासुरे, अभिषेक लबडे आदींसह सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संकलन

समता मीडिया सर्व्हिसेस

श्रीरामपूर - 9561174111

LightBlog

Pages