महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रीक निवडणुक २०२४ पार्श्वभुमीवर - Mohsin e Millat Old

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

Wednesday, 13 November 2024

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रीक निवडणुक २०२४ पार्श्वभुमीवर

 

नाशिक शहर पोलीस आयुक्तालय कार्येक्षेत्रातील अवैध धंदे करणाऱ्या

३८९ इसमांवर हद्दपारीची कारवाई


नाशिक प्रतिनिधी / माजिद खान

मा.संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरात विधानसभा निवडणुक २०२४ अनुषंगाने निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पाडावी व नागरीकांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडतांना त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची भिती न राहता भयमुक्त वातावरण मतदान प्रक्रिया पाडावी, नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अवैध धंदे करणारे इसम यांचेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्या बाबत पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी आदेश दिलेले होते.


विधानसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभुमीवर पोलीस आयुक्तालय हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखणेसाठी तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडुन सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा पोहचु नये म्हणुन दारू, अंमलीपदार्थ, जुगार, गोमांस, इतर अवैध धंदे करणारे इसम यांचे गतीविधींना प्रतिबंध व्हावा व सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी या करीता पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील आडगांव पो.स्टे. कडील- २२, पंचवटी-३४, म्हसरूळ-१३, आडगांव २२, मुंबईनाका १८, सरकारवाडा- ०४, भद्रकाली-४५, गंगापुर -०४, सातपुर-२२, अंबड -३७, इंदिरानगर- ४०, चुंचाळे- ५५, उपनगर- ३५, नाशिकरोड ३८, देवाळाली कॅम्प -२२ असे एकुण ३८९- सराईत गुन्हेगारांवर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कायदा कलम १६३ अन्वये दिनांक १६/११/२०२४ रोजीचे ००.०१ वाजेपासुन ते दिनांक २०/११/२०२४ रोजीचे सकाळी ०७.०० वाजेपावेतो तसेच २०/११/२०२४ चे १४.०० वाजेपासुन ते २४/११/२०२४ चे २४.०० वाजेपावेतो हददपार करण्यात आले आहे.


महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रीक निवडणुक २०२४ कालावधीत कोणत्याही प्रकारे उपद्रव होवु नये म्हणुन भा.ना.सु. संहिता कायदयान्वये खालील इसमांवर दिनांक प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

संकलन

समता मीडिया सर्व्हिसेस 

श्रीरामपूर - 9561174111

LightBlog

Pages