प्रि -वेडिंग शुट: चांगले की वाईट? - Mohsin e Millat Old

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

Tuesday, 22 October 2024

प्रि -वेडिंग शुट: चांगले की वाईट?


 

सौ.मीनल अमोल उनउने..सातारा


९१३०४७०३९७



        माझी मैत्रीण मुग्धा - बरोबर संसारात रममाण होती. त्यांच्या दोन्ही मुली लग्नाच्या वयाच्या झाल्या होत्या. गिरीजा आणि सायली. दोघीही सालस, सुसंस्कारित, दिसायला एकदम छान. थोरली गिरीजा आयटी कंपनीत जाॅबला तर सायलीने एम कॉम पुर्ण करुन बॅकिंग च्या स्पर्धा परिक्षेत डोकं घातलेलं.

             गिरीजाला स्थळं येऊ लागली. सुट्टीच्या दिवशी हाच कार्यक्रम ठरला होता - स्थळं पाहणे. मुलाकडील मंडळी घरी बोलावणे आणि पाहूणचार करणे. रविवारची सुट्टी अशी ठरल्यातच जमा होती. असे करता - करता एका स्थळाची पसंती झाली. एकमेकांची पसंती झाली. पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने दिवाळी नंतरचा मुहूर्त काढण्याचे ठरले. तोपर्यंत साजेलसा साखरपुडा करण्यात आला. आता काय हळूहळू फोनवरच्या गप्पा सुरू झाल्या. ऑफिसला जाताना - येताना यांचे फोन कॉल्स सुरूच असत.

              मुग्धा व सतिश यांच्या मनात विचार आला की सायलीचेही लग्न जमले तर बरे होईल. दोघींचेही एकाच हॉलमध्ये करता येईल. सर्वच गोष्टी जुळून आल्या तर बरे होईल. सर्वच दृष्टीने सोयीचे होईल. आणि काय योगायोग. पाहूण्यांपैकी एकाने सायलीसाठी स्थळ सुचविले आणि सर्वांच्या संमतीने बघण्याचा कार्यक्रम देखील करण्यात आला. समोरासमोरच पसंती देखील झाली.

           मुग्धा व सतिश यांनी गिरीजाकडील पाहूण्यांना एकत्र लग्नाविषयी विचार मांडले. त्यांचीही एकत्र लग्न समारंभाकरीता काहीच हरकत नव्हती. हळूहळू तिन्ही घरी तयारी सुरू झाली. डिसेंबर मधील लग्नाची तारीख ठरली. त्यानुसार हॉल बुकिंग, केटरर्स, डेकोरेटर्स या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्यात आले.

               आता अलिकडेच निघालेल्या नविन फॅशन नुसार प्रि - वेडिंग शुट करीता गिरीजाच्या सासरकडील मंडळींनी सुचविले. त्यानुसार गिरीजाचा होणारा नवरा साहिल याने गिरीजास काही लोकेशन्स देखील सांगितली. आता गिरीजाचे प्रि - वेडिंग शुट होणार म्हटल्यावर सायली आणि निखील या दोघांचेही तसे ठरले.

               लग्नाला आणखी दोन महिने अवधी होता. दिवाळी सणाला जोडूनच चौघांनीही ४-५ दिवसांच्या सुट्ट्या घेतल्या. प्रि - वेडिंग शुटसाठी दापोली व गोवा याठिकाणी शुट करण्याचे ठरले. ४-५ मित्र - मैत्रिणींसह सर्वजण अगोदर पोहोचले ते गोव्यामध्ये. लेडीज व जेन्ट्स यांचेसाठी वेगवेगळ्या रूम्स घेण्यात आल्या. गोव्यातील बीचवर व इतर ठिकाणी शुटिंग करून दापोलीला उर्वरित शुटिंग करण्यात आले. तिथेच सर्वांच्या सुट्ट्या संपल्या.

              प्रि - वेडिंग शुटमुळे होणारे नवरा - नवरी खुपच खुश होते. थोडंसं जवळून न्याहाळायची, समजून घ्यायची संधी चौघांनाही मिळाली होती. त्यामुळे फोनवरच्या गप्पांचा ओघ आणखीनच वाढला होता. मात्र; गिरीजा अधूनमधून अपसेट वाटू लागली. मनापासून बोलत नसल्याचे जाणवू लागले. एके रविवारी दोघं डिनरला गेली असता दोघांच्या मध्ये खुपच वादावादी झाली. आणि दोघांनीही टोकाचे निर्णय घेऊन मोकळे झाले. दोन्हीकडील घरच्यांनी एकमेकांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण, सर्वकाही व्यर्थ. गिरीजा व साहिल यांनी एकमेकांना नकार दिला. आणि तिथेच दोघांचे लग्न मोडले. लग्न तर आता एक महिनाच लांब होते. मुग्धा व सतिशला खूप वाईट वाटले. सायली पण लग्नाला तयार होईना. तिने निखिलला सर्व सांगून लग्न पुढं ढकलूया असे सांगितले. निखील व त्याच्या घरचे तयार झाले. पण; गिरीजाने सायलीची समजूत काढली. मुग्धा व सतिशनेही तिला समजून सांगितले. आणि मग सायली तयार झाली.

            प्रश्न उरतो तो प्रि - वेडिंग शुटिंगचा. त्याचे काय करायचे? शुटिंगची सीडी तोडता येईल. अजून ती पुर्ण तयार व्हायची होती. पण; तुटलेल्या मनांचे काय? तुटलेल्या नात्यांचे काय? मनात शुटिंगच्या आठवणी तर येणारच ना! 

        पण; त्याचवेळी सायली आणि निखील या दोघांचीही मनं चांगली जुळली होती. प्रि - वेडिंग शुटिंगच्या वेळी दोघांनी गप्पांमधून एकमेकांच्या आवडीनिवडी, विचार जाणून घेतले होते. शिवाय एकमेकांच्या कुटूंबातील समस्यांविषयीही आपूलकी निर्माण केली होती. आणि त्यादृष्टीने ते पाहतही होते.

              गिरीजा आणि साहिल मात्र एकमेकांच्या मनावर विचार लादत राहिले आणि एकमेकांना समजून घेण्यात अपयशी ठरले. कदाचित हिच घटना लग्नानंतर घडली असती तर संसार मोडला असता, आणखी काही विपरीत झाले असते. पण; जर का असा विचार केला असता तर की; आता आपले लग्न झाले आहे घेऊया सांभाळून. कदाचित असेही होऊ शकले असते. पण; या जर - तर च्या गोष्टी कोण जाणे? 

           प्रि - वेडिंग शुट एकाच घरातील एकीसाठी फायद्याचे ठरले तर एकीसाठी नुकसानीचे. आणि जर हे प्रि - वेडिंग शुट झालेच नसते तर? या प्रि - वेडिंग शुटमुळे सायली व निखील सारख्या अनेक जोडप्यांची मने जुळताहेत. त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होतेय. कदाचित या गोष्टी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शकही ठरतील. पण; गिरीजा व साहिल यांच्या सारख्यांचे काय? सगळेच असे असणार नाहीत. सर्वांनाच प्रवाहाबरोबर जायचे असते. हौस - मौज करा पण; त्याबरोबर काय चुक काय बरोबर हे देखील शिकायचे असते. सर्वकाही व्यवस्थितच होईल.

    


   - सौ. मिनल अमोल उनउने.

   - सातारा.

     - मो. नं. ९१३०४७०३९७

LightBlog

Pages