धामोरी येथील वि.का.सेवा सोसायटीच्या सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप - Mohsin e Millat Old

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

Thursday, 4 November 2021

धामोरी येथील वि.का.सेवा सोसायटीच्या सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप

 



धामोरी (दत्तात्रय घुले) -  कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. संस्थेचे अध्यक्ष भगवान माळी यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे ज्येष्ठ संचालक चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडली. कै. पंडितराव कुलकर्णी यांनी सन १९५० मध्ये स्थापन करण्यात आलेली संस्था आता प्रगतीपथावर आहे. संस्थेमार्फत शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे कर्ज वितरण, सर्व प्रकारच्या रासायनिक खतांची विक्री, कृषी औषधांची विक्री व स्वस्त धान्य दुकान चालविणे जाते. करोना काळात नैसर्गिक आपत्ती असताना सुध्दा संस्थेला मोठ्या प्रमाणात १४.४२ लाख नफा झाला आहे. संस्थेने गेली २५ ते ३० वर्षांची डिव्हीडंड वाटपाची परंपरा आजही राखीव ठेवण्यात आली आहे. आजही सभासदांना १० टक्के लाभांश व सेवकांना दोन महिन्यांचा पगार देऊन परंपरा कायम राखून ठेवली. 

        या वेळी या आयोजित कार्यक्रमा प्रसंगी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष माधवराव खिलारी, पुंडलिक माळी, कैलास 

माळी, सुदाम गाडे, अभियंता आचार्य, संचालक बबन वाघ, देवराम माळी, अरुण भाकरे, बाबुराव दरेकर, भास्कर वाघ, भाऊसाहेब खिलारी, दिलीप माळी, माणिक सोमासे,अभिजित उसरे,भाऊसाहेब माळी, राजेंद्र वाघ, बाळासाहेब आहिरे, सतिश कोळपे, निवृत्ती शिंदे, आनंद वाघ, भाऊसाहेब भाकरे व अनेक सभासद उपस्थित होते. 

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष प्रा. नारायण बारे, सचिव मनोज कुलकर्णी यांनी अहवाल वाचून केले. अध्यक्ष भगवान माळी यांनी आभार मानले.

LightBlog

Pages